बिनबुडाच्या एफआयआर विरुद्ध पुण्याचे वकील

Advocates Against Frivolous FIRs (AAFF)


Frivolous (बिनबुडाची) एफआयआर म्हणजे खोटी तक्रार नव्हे. तक्रार खोटी आहे किंवा कसे ते कोर्ट ठरवितं. खोट्या तक्रारी वर झालेली एफआयआर Frivolous नसते. पण एफआयआर मधील जबाबात गुन्हा दिसूनच येत नसेल, तर ती एफआयआर Frivolous, बिनबुडाची, फालतू आणि फक्त एका संपन्न वाटण्याऱ्या "आरोपी" ची पिळवणूक करण्या करिता केलेली एफआयआर म्हणता येईल. ही पिळवणूक (extortion) म्हणजे लाच (bribe) नाही. एखादा धनाढ्य व्यक्ती गुन्हा करून एफआयआर न करण्यास पोलीस ला रक्कम किंवा इतर लाभ देतो, ती लाच. तो एक वेगळा विषय आहे.

AAFF Case Study No. 1

वाकड पोलीस ने नोंदविलेली ही एफआयआर (नावे इत्यादि वगळली आहेत) frivolous आहे का? अशी शंका नुकतीच सत्र न्यायालयाने व्यक्त केल्याचे पुणे मिरर या वर्तमान पत्रात त्यांच्या प्रतिनिधि विजय चव्हाण यांनी प्रसिद्ध केले आहे. आपण सदरील एफआयआरचा अभ्यास करावा. त्या नंतर या एफआयआरवर AAFF च्या पाहिल्या बैठकीत चर्चा करूया.
अटक करण्याचा हक्क पोलीस भ्रष्टाचारच्या अनेक फायदेशीर स्रोतांपैकी एक स्रोत आहे. -- सर्वोच्च न्यायालय

Letter to the members