AAFF बद्दल काही


Back to Homepage of AAFF
वारंटविना "अटक करण्याचा हक्क पोलीस भ्रष्टाचारच्या अनेक फायदेशीर स्रोतांपैकी एक आहे." -- सर्वोच्च न्यायालय न्यायनिर्णय AIR 2020 SC 831
"भ्रष्टाचार साठी धादांत बिनबुडाची एफआयआर" ही समस्या पुणे जिल्ह्यातून कायदेशीर रित्या नाहीशी करण्याकरिता आम्ही एकत्र आलो आहोत. खोट्या एफआयआर एक अलिखित नियम नसून अपवाद असल्याची आम्हाला खात्री आहे. आम्ही पोलीसदळातील प्रत्येक व्यक्तीचा मनापासून आदर करतो.
पोलिस मॅन्युअल वॉल्यूम तीन (पोलीस चे अधिकार आणि कर्तव्य) नियम ११३(१२), १२३(बी), आणि १२५, तसेच सी.आर.पी.सी. चॅप्टर १२ (विशेष म्हणजे कलम १५८ व १५९) यांची नीट अंमलबजावणी करीता पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे हात मजबूत करणे हा आमचा मुख्य उद्दिष्ट आहे.
कोणत्याही वकिल बंधु-भगिनीने त्यांच्या आशिलाविरुद्ध झालेली एफआयआर स्पष्टपणे खोटी, बिनबुडाची असल्याचे आमच्या कॅमेटीला पटवून दिले, तर आम्ही न्याय मिळवून देण्यास त्यांना ह्या प्रकारे मदत करू:
१. केस-स्टडी तयार करणे.२. केस-स्टडी तपास अधिकारीस दाखवून एफआयआर "बी" रिपोर्ट द्वारे फाईल न करण्यास काय कारण आहेत ते समजून घेणे. ३. कॅमेटीचा समाधान न झाल्यास पोलिस आयुक्तालयात दाद मागणे. ४. दाद न मिळाल्यास केस-स्टडी आपल्या संकेत स्थळावर अपलोड करणे आणि गृह खात्यास विनंती करणे.५. AAFFच्या वतीने सह-अर्जदार म्हणून संबद्ध वकिलांना कोर्टात मदत करणे. ६. आपल्या कार्यात प्रेस ची मदत मागणे.७. वेळोवेळी मीटिंग घेऊन समस्येवर चर्चा करणे आणि निर्णय घेणे.

आम्ही पोलिसच्या विना वारंट अटक करण्याच्या हक्काचे पुणे जिल्ह्यातील काही एक ठण्यातून भष्टाचारपायी दुरुपयोग झाल्यास त्याचे सर्व साधारण नागरिकांवर होण्याऱ्या आर्थिक, सामाजिक आणि मानवी-हक्क परिणाम बद्दल चिंतित आहोत.
आम्ही गैरराजनीतिक आहोत. आपण या जनहिताच्या कामाकरीता नि:संकोच पुढे यावे. आमचा मंच इतर जिल्ह्यातील वकील मंडळी करिता सुद्धा खुल्ला आहे.Back to Homepage of AAFF